शीतल टाइम्स //-श्रीरामपूरचे भाविकांची कैलास मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


श्रीरामपूरचे भाविकांची कैलास मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण

बेलापूर (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील चार भाविकांनी कैलास मानसरोवर यात्रा व इतर पवित्र स्थळांचे दर्शन यशस्वीपणे पूर्ण केले. या यात्रेत त्यांनी मानसरोवरमध्ये स्नान करून भगवंतांचे दर्शन घेतले व यम द्वारातून परिक्रमा सुरू केली. शिवशंकर स्थान, गौरीकुंड, पार्वती स्थान तसेच गणपती जन्मस्थान येथे दर्शन केले. ४२ किलोमीटरची परिक्रमा करून त्यांनी काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरातही दर्शन घेतले.
यात्रेकरूंनी सहाव्या दिवशी मानसरोवर ९० किलोमीटर गाडीने परिक्रमा केली व नामस्मरण करून कैलास पर्वत अष्टपदाचे दर्शन घेतले. जैन परंपरेनुसार वृषभ देव मुनींचे तपस्तळ पाहून यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यात्रेसाठी ट्रॅव्हल्स, इन्शुरन्स, डेबिट परमिट, चीन व्हिजा माहिती व चीनच्या चलनी नोटा (युवान) आवश्यक होत्या.

यात्रेत प्रथितयश व्यापारी राम बिलास नावंदर, चांगदेव पुजारी, हरिभाऊ उंडे आणि कांताबाई उंडे सहभागी झाले. अनेक अडचणींवर मात करून त्यांनी ही पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव