शीतल टाईम्स //- बेलापुर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सविता राजुळे यांची बिनविरोध निवड

       


शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापुर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सविता राजुळे यांची बिनविरोध निवड

बेलापूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सविता प्रकाश राजुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे, शरद नवले आदींनी अभिनंदन केले आहे.

माजी सरपंच सौ. प्रणालीताई भगत यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सौ. सविता राजुळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडे, वसंत पुजारी, दिलीप भगत, राजेंद्र बारहाते, सौ. प्रणाली भगत, कल्पनाताई भगत, राणी पुजारी, नयनाताई बडधे, प्रियंकाताई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून नितीन मुळे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र मेहत्रे आणि कामगार तलाठी शिंदे मॅडम यांनी सहकार्य केले.

यावेळी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक द्वारकनाथ बडदे, ज्ञानदेव वाकडे, विनय भगत, राजेंद्र कुंकूलोळ, उपसरपंच ॲड. दिपक बारहाते  सुनील क्षिरसागर, शशिकांत पुजारी, रामदास थोरात, राकेश बडदे, बी. एम. पुजारी, गोरख भगत, पंकज खर्डे, जितेश महाडिक, विक्रांत पाटील, पंकज पाटील, पोलीस पाटील उमेश बारहाते, युवराज जोशी, ऋषिकेश बारहाते, चंद्रकांत गाढे, ऋषिकेश महाडिक, रणजीत काळे, सतीश बारहाते, अशोक महाडिक, राजेंद्र गागरे, शंकर बारहाते, अनिल बारहाते, प्रशांत बडदे, नंदू कुऱ्हे, समीर सय्यद, अर्जुन गोरे, कैलास थोरात, गणेश महाडिक, अमोल जोशी, किशोर कांबळे, राहुल शेलार, सुनील बडधे, संतोष बडधे, महेश बडधे, सागर तागड यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. सविता राजुळे यांनी गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव