शीतल टाईम्स //- बेलापूरमध्ये संत सावता महाराज मंदिराच्या सभामंडपाचे उद्या भुमीपूजन बेलापूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी)
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूरमध्ये संत सावता महाराज मंदिराच्या सभामंडपाचे उद्या भुमीपूजन
बेलापूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी):
बेलापूर येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या नूतन सभामंडपाच्या भुमीपूजन सोहळ्याला उद्या सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे. या पावन कार्याचा प्रारंभ देवगड दत्त देवस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्या पावन हस्ते होणार असून, या सोहळ्यास ह.भ.प. मुकुंद महाराज जाटदेवळेकर, ह.भ.प. गोविंद महाराज जाटदेवळेकर आणि ह.भ.प. सोपान महाराज हिरवे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
सभामंडपाच्या भुमीपूजनानंतर सकाळी ११ वाजता भगवान केशव-गोविंद मंदिर येथे ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू होणार आहे. या निमित्ताने महंत भास्करगिरी महाराज यांचे साक्षात प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
संत सावता महाराज मंडळ व भगवान केशव-गोविंद ज्ञानयज्ञ सप्ताह समितीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा