शीतल टाइम्स //- ऐनतपूर नवले वस्तीतील वीरभद्रेश्वर मंदिर उत्सवाची हरिकीर्तनाने सांगता


शीतल टाइम्स प्रतिनिधी


ऐनतपूर नवले वस्तीतील वीरभद्रेश्वर मंदिर उत्सवाची हरिकीर्तनाने सांगता 

बेलापूर (वार्ताहर) : 

ऐनतपूर नवले वस्ती येथील जागृत देवस्थान श्री वीरभद्रेश्वर मंदिरात दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हरिभक्त परायण रवींद्र महाराज मुठे यांचे जाहीर हरिकीर्तन होऊन उत्सवाची सांगता झाली.

यावेळी प्रवचनात मुठे महाराज म्हणाले की, सकाळी उठून भगवंताचे नामस्मरण करावे. वीरभद्रेश्वर देवाच्या चरणी प्रार्थना करून “माझ्या हातून चांगले कार्य होऊ दे, कुणाचेही वाईट होऊ देऊ नको, आणि आई-वडिलांची सेवा, गाईची सेवा, मंदिरासाठी दिलेले दान व पंढरीची वारी कधीही वाया जात नाही” या शिकवणीचे पालन करावे.

या सोहळ्यात वेदमूर्ती महेश दिलीप दायमा (राजस्थान गोठ मंगलोद दधिमती गुरुकुल) याने भारतातील ४२ गुरुकुलांच्या वेदोत्सव परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका प्राप्त केल्याबद्दल त्याचा माता-पित्यांचा मुठे महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले, यांची संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे, सरपंच मीनाताई साळवे, विश्व हिंदू परिषद मठ मंदिर समिती नाशिकचे दत्तात्रय बहिरट, तीन वेळा नर्मदा परिक्रमा पायी केलेले महंत जंगम स्वामी, ऐश्वर्या थोरात (नगररचना विभागात निवड) तसेच सायली अमोलिक (स्पर्धा परीक्षा यश) आदींचा सत्कार करण्यात आला.

कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरभद्रेश्वर मंदिर समितीचे संयोजक व ऐनतपूर-बेलापूर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव