शीतल टाईम्स //- धान्य बंद! सरकारचा निर्णय – भुकेल्यांच्या पोटाला न्याय की आकड्यांचा खेळ? ३ लाख शिधापत्रिकांवर कारवाई; प्रतीक्षा यादीसाठी कोटा मोकळा
शीतल टाइम्स प्रतिनिधी
धान्य बंद! सरकारचा निर्णय – भुकेल्यांच्या पोटाला न्याय की आकड्यांचा खेळ?
३ लाख शिधापत्रिकांवर कारवाई; प्रतीक्षा यादीसाठी कोटा मोकळा
पुणे:(शीतल टाईम न्यूज नेटवर्क)
सहा महिन्यांपासून रेशनचे धान्य न उचलणाऱ्या तब्बल ३ लाख ३३ हजारांहून अधिक शिधापत्रिकांचे धान्य बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सरकार म्हणते, हा कोटा प्रतीक्षा यादीतील कुटुंबांना दिला जाणार आहे. पण प्रश्न असा आहे की, इतके लोक धान्य का उचलत नव्हते? त्यांना खरोखर गरज नव्हती की व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही?
अंत्योदय व प्राधान्य योजनेअंतर्गत केंद्र सरकार धान्य पुरवते, पण कोटा सर्व राज्यांसाठी एकत्रित असल्याने जिल्ह्यांच्या मागणीनुसार तो वाढवणे कठीण होते. त्यामुळे “ज्यांनी घेतले नाही, त्यांचा कोटा काढा आणि दुसऱ्यांना द्या” ही पद्धत सरकारने अवलंबली आहे.
सरकारी आकडे सांगतात की गेल्या सहा महिन्यांपासून ३,३३,८८१ शिधापत्रिकांवरील ८,७३,०६३ जणांचे धान्य उचलले गेलेले नाही. त्यामुळे आदेश स्पष्ट आहेत की, हा कोटा बंद करा आणि प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना धान्य द्या. त्याचबरोबर कुटुंबातील मृत व्यक्तींची नावे थेट शिधापत्रिकेतून वगळण्याचीही कारवाई सुरू होणार आहे.
पण या सगळ्याच्या आड खरी गोष्ट लपून राहते ती म्हणजे, धान्य न घेणाऱ्यांची संख्या एवढी मोठी असण्यामागे भूक संपली की व्यवस्थेची भुकेबद्दलची संवेदना हरवली?
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा