शीतल टाईम्स //-बेलापूर ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपतर्फे शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपतर्फे शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा
बेलापूर प्रतिनिधी /-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर बु. ग्रामपंचायत आणि सत्यमेव जयते ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १७ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता ‘शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा रयत शिक्षण संस्था, सातारा येथील ख्यातनाम कलाशिक्षक राजेंद्र घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळा श्री संत सावता महाराज मंदिर (अरुणकुमार वैद्य पथ) येथे पार पडणार असून, फक्त बेलापूर–ऐनतपूर येथील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील.
प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल. शाडू माती आयोजकांकडून दिली जाईल, तर पाण्यासाठी लागणारे भांडे विद्यार्थ्यांनी सोबत आणावे.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
सचिन साळुंके 📞 ९६५७७११००१
हेमंत मुथा (प्रमोद जनरल स्टोअर्स)
📞 ८३०८४८०९
सुधीर करवा (सुदर्शन सुपर शॉपी)
📞 ९०११७९४४९८
ग्रामपंचायत बेलापूर बु. व सत्यमेव जयते ग्रुपतर्फे सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा