शीतल टाईम्स //- कर्नाटक एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी ६०० कि.मी. अंतराचे बंधन रद्द : रणजित श्रीगोड
शीतल टाइम्स प्रतिनिधी
कर्नाटक एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी ६०० कि.मी. अंतराचे बंधन रद्द : रणजित श्रीगोड
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : बेंगळुरू- दिल्ली दरम्यान धावणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी पूर्वी लागू असलेले ६०० किलोमीटरचे अंतर बंधन रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी दिली.
याआधी या सुपरफास्ट गाडीने प्रवास करण्यासाठी किमान ६०० किमीचे अंतर असणे आवश्यक होते. त्यामुळे अचानक प्रवास करायचा झाल्यास सामान्य प्रवाशांना अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत असे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. धर्मवीर मीना यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान प्रवासी संघटनेने ही समस्या मांडली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने आता हे अंतराचे बंधन रद्द केले आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना कोणत्याही स्थानकावरून कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये सामान्य किंवा आरक्षित तिकीट घेऊन सहज प्रवास करता येणार आहे.
या सकारात्मक निर्णयामुळे प्रवासी जनतेची होणारी अडचण दूर झाली असून, प्रवासी संघटनेचे सचिव श्री. अनिल कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा