शीतल टाइम्स //-श्रीरामपूरात ‘जय हो’ देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधीं
श्रीरामपूरात ‘जय हो’ देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न
बेलापूर (प्रतिनिधी) :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या महान क्रांतीकारक तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी श्रीरामपूरमधील ‘सितारों की दुनिया’ या कराओके ग्रुपतर्फे १५ ऑगस्ट रोजी सकाळी आझाद मैदान येथे ‘जय हो’ देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात ग्रुपचे गायक कलाकार कैलास सोमाणी, रवी बोर्ड, श्रीगित हिरे, डॉ. दिलीप शेजवळ, सौ. राखी लोढा, भीमगिरी कांबळे, बाळासाहेब नेहे, भैरव अडागळे, अशोक गायकवाड, दीपक बोरसे, फत्तुभाई सय्यद यांनी देशभक्तीपर गीतांची मनोभावे प्रस्तुती केली.
भर पावसातही प्रेक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. राष्ट्रप्रेरित गीतांनी वातावरण भारून गेले. कार्यक्रमाची सुरुवात ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने झाली तर समारोप ‘वंदे मातरम्’ ने करण्यात आला. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले.
‘जय हो’ या कार्यक्रमाचा उद्देश देशाबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे, नव्या पिढीत देशभक्ती रुजवणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमासाठी कृष्णा कलेक्शन यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले. याशिवाय कृष्णा वुमेन्स वेअर, कृष्णा किड्स वेअर, द ब्रँड स्टोअर, समाधान पापड-मसाले-अचार, मगर वीट उत्पादक व सप्लायर्स, सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, स्वामिनी महिला विकास को-ऑपरेटिव्ह सोसायटी, प्रियदर्शनी महिला तंत्र शिक्षण मंडळ, माधवबाग क्लिनिक, ग्रॅज्युएट चहा व लस्सी, डेप्युटी समोसा श्रीरामपूर आदी संस्थांचेही प्रायोजकत्व लाभले.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा