शीतल टाईम्स //-बेलापूरला शुक्रवारी संतश्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा

     

शीतल टाइम्स प्रतिनिधी




बेलापूरला शुक्रवारी संतश्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा

बेलापूर (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र बेलापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने भव्य शोभायात्रा व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मिरवणूक मार्गावर महिला भगिनींनी सडा-रांगोळी काढावी तसेच प्रत्येकी पाच पणत्या (तेल व वातीसह) दीपोत्सवासाठी आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीत कलश घेऊन सहभागी व्हावे व थोडासा प्रसाद सोबत आणावा, असेही संयोजकांनी सांगितले आहे.

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री केशव गोविंद मंदिरातून संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता भव्य दीपोत्सव पार पडणार आहे.

या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महिला-पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रम संयोजकांनी केले आहे.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव