शीतल टाईम्स //- संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी शरद नवले यांची निवड
शीतल टाइम्स प्रतिनिधी
संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी शरद नवले यांची निवड
श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अशोकनगर येथील एका जाहीर कार्यक्रमात केली.
शरद नवले हे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील राजकीय, सामाजिक व सहकारी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
गरजू, निराधार, अपंग, वृद्ध, व विधवा नागरिकांसाठी त्यांनी दिलेली सातत्याची सेवा, त्यांचा संयमित व समन्वयशील नेतृत्वशैलीचा अनुभव या गोष्टी लक्षात घेता ही निवड अत्यंत योग्य ठरल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल शरद नवले यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, तसेच बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, रणजीत श्रीगोड, विष्णुपंत डावरे, देविदास देसाई, सुहास शेलार, शकील (बाबा) शेख, दिलीप दायमा, दादासाहेब कुताळ, जालिंदर कुऱ्हे, विजय अमोलिक, मोहसीन आतार, प्रा. प्रकाश देशपांडे, अल्ताफ शेख, मोहसीन बागवान, बंटी शेलार, भैय्या शेख, जिना शेख आदिंनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या नव्या नियुक्तीमुळे तालुक्यातील निराधार, अपंग व गरीब कुटुंबीयांसाठी शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील सामाजिक कल्याणाच्या कामात नवले यांचा अनुभव व कार्यशैली उपयुक्त ठरेल, अशी आशाही विविध क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा