शीतल टाइम्स //- नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत भीषण आग : एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
दिनांक: 18 ऑगस्ट 2025
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत भीषण आग : एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
नेवासा प्रतिनिधी :
येथील शहरातील मयूर रासने यांच्या फर्निचर दुकानाला आज सकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
फर्निचर दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे मयूर अरुण रासने (वय 45), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (वय 38), मुलगा अंश मयूर रासने (वय 10) आणि चैतन्य मयूर रासने (वय 7) या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत एका वयोवृद्ध महिलेस (वय अंदाजे 70 वर्षे) किरकोळ जखमा झाल्या असून, किरण रासने (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून, आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.
- शीतल टाइम्स प्रतिनिधी, नेवासा
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा