शीतल टाईम्स //- केशव-गोविंद सप्ताहाची उद्या सांगता हरिहर-तीर्थ श्रीक्षेत्र बेलापूर संतांची पावन भूमी: महंत भास्करगिरी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
केशव-गोविंद सप्ताहाची उद्या सांगता
हरिहर-तीर्थ श्रीक्षेत्र बेलापूर संतांची पावन भूमी: महंत भास्करगिरी
बेलापूर (प्रतिनिधी):
श्रीक्षेत्र बेलापूर येथील ग्रामदैवत हरिहर केशव-गोविंद भगवान यांच्या ज्ञानयज्ञ व भागवत कथा सप्ताह सोहळ्याची सांगता बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) होणार असून यानिमित्ताने धार्मिक वातावरणात भक्तिरसाची अनुभूती होत आहे.
रविवारी झालेल्या कार्यक्रमास देवगड देवस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांनी विशेष भेट देत भाविकांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी श्रीक्षेत्र बेलापूर हि केवळ तीर्थभूमीच नव्हे, तर संतांचीही पवित्र भूमी असल्याचे गौरवोद्गार काढले.
"हरिहर, केशव व गोविंद महाराजांची त्रिस्थळी असलेल्या बेलापूरला काशीचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. शिवाय, रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत गोविंददेवगिरीजी महाराज यांची ही जन्मभूमी आहे, त्यामुळे ही संतांचीही पुण्यभूमी आहे," असे महंत भास्करगिरी महाराज म्हणाले.
कार्यक्रमात ह.भ.प. सोपान महाराज हिरवे, ह.भ.प. शुभम कांडेकर, ह.भ.प. कृष्णा महाराज शिरसाठ, बाळूमहाराज कानडे तसेच ताहाराबाद देवस्थानचे ह.भ.प. अर्जुनमहाराज तनपुरे यांची उपस्थिती होती. महंत भास्करगिरी महाराज यांनी केशव-गोविंद मंदिरात सश्रद्ध दर्शन घेतले.
या प्रवचनास महिलांचा विशेष सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हरिहर केशव-गोविंद सप्ताह समिती, महिला भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, संत सावता महाराज भजनी मंडळ आणि युवक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता:
- मंगळवार दि. ५ ऑगस्ट सायं. ५ वा. – हरिहर शोभायात्रा
- बुधवार दि. ६ ऑगस्ट सकाळी १० वा. – विद्याविभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे काल्याचे कीर्तन
- त्यानंतर – महाआरती व महाप्रसाद

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा