शीतल टाइम्स //-बैलांसह ट्रॅक्टरलाही मानाचा मुजरा, पोळा उत्साहात
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बैलांसह ट्रॅक्टरलाही मानाचा मुजरा
बेलापूर मध्ये पोळा सण उत्साहात साजरा
बेलापूर (वार्ताहर) :
शेतकरी बांधवांचा आनंदाचा सण असलेल्या बैलपोळ्याचा उत्साहाने व आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बळीराजांनी आपल्या जोत्याला जीवनभर सोबतीला असलेल्या बैलजोड्यांना स्नान घालून, रंगरंगोटी करून, विविध अलंकारांनी सजवून गावामध्ये मिरवणूक काढली. ढोल-ताशा, लेझीम यांच्या गजरात गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, सुनीलभाऊ मुथा, भरत साळुंके, चंद्रकांत नाईक, विक्रम नाईक, वैभव कुऱ्हे, पप्पु खरात, नितीन शर्मा यांचेसह शेखर गवते, अभिषेक निर्मळ, योगेश शिंदे, रितेश कु-हे, मनोज कु-हे, सागर कु-हे, दीपक अनाप, कृष्णा गवांदे, प्रसाद कु-हे, बाळासाहेब खामकर, तुषार जेजुरकर, ज्ञानेश्वर ओहोळ, अनिल कु-हे, ऋषी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बैलजोडी : भावेश कुऱ्हे, नितीन खोसे, वैभव कुऱ्हे यांनी सजवून आणले होते.
तर ट्रॅक्टर सजावट : गणेश कुऱ्हे, दत्ता साळुंके, नितीन कुऱ्हे, प्रवीण गाढे, काकासाहेब कुऱ्हे, शुभम कुऱ्हे, मनोज भांड, अमोल राशीनकर यांनी आकर्षक पद्धतीने केली.
गावातील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोळा सणाचा आनंद लुटत होते. बैलराजाची आरास, शेतकऱ्यांचे उत्साही चेहरे आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा झालेला पोळा सण म्हणजे शेतकरी बांधवांच्या जीवनातील आनंदाचा क्षण ठरला. सदर मिरवणुकीचे आयोजन वैभव कु-हे, भावेश कु-हे, गौरव कु-हे, कु-हेवस्ती व बेलापुर ग्रामस्थ यांनी केले होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा