शीतल टाइम्स //- बेलापूरात उत्साहात स्वातंत्र्यदिन संपन्न ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण

 


शीतल टाइम्स प्रतिनिधी


बेलापूरात उत्साहात स्वातंत्र्यदिन संपन्न

ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण

बेलापूर प्रतिनिधी -

देशाचा ७९ वा सामुदायिक स्वातंत्र्यदिन बेलापूर बु|| येथे उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मुख्य विजयस्तंभ चौकात सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सरपंच मिनाताई साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे, तसेच ज्येष्ठ नागरिक कंजीशेठ टाक, सुवालालजी लुक्कड, मोहनराव नवले, अशोकनाना साळुंके, रणजीत श्रीगोड, शरदराव देशपांडे, अरविंदजी राठी, माधवराव कुहे, शांताराम खंडागळे, बहोद्दीन सय्यद, बापूसाहेब वाबळे, जगन्नाथ अमोलिक, श्रीराम मोरे, भास्करराव गायकवाड यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपटराव गावडे सर यांनी केले. यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच शाळा–महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त जि.प. मराठी मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी आकर्षक कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाला उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव