शीतल टाईम्स //-शरद नवले यांची अध्यक्षपदी निवड : बेलापूरमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार बेलापूर प्रतिनिधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
शरद नवले यांची अध्यक्षपदी निवड : बेलापूरमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार
बेलापूर प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी शरद नवले यांची निवड झाल्याने तालुक्यातील बेलापूर-ऐनतपूर या ग्रामीण भागास मोठी संधी मिळाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांचा बेलापूर बु. येथील झेंडा चौकात सत्कार करण्यात आला.
या वेळी नवीन अध्यक्ष शरद नवले यांचेसह गावातील ग्रामस्थ, स्थानिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या हस्ते डॉ.सुजय विखे पाटील यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुरुषोत्तम भराटे, विशाल आंबेकर, राजेंद्र कुताळ, सागर ढवळे, सचिन वाघ, बाळासाहेब दाणी, सचिन पारखे, उमेश भांड, साईनाथ शिरसाठ आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गरजू, विधवा, अनाथ आणि अपंग व्यक्तींना शासनाच्या विविध मदती पोहचविण्यात येते. या अध्यक्षपदावर एका ग्रामीण कार्यकर्त्याची निवड झाल्याने बेलापूर-ऐनतपूर परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा