शीतल टाइम्स //-संक्रापुर सोसायटीच्या चेअरमनपदी भरतरीनाथ सालबंदे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर होन बिनविरोध निवड

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


संक्रापुर सोसायटीच्या चेअरमनपदी भरतरीनाथ सालबंदे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर होन बिनविरोध निवड


संक्रापुर (प्रतिनिधी) – संक्रापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भरतरीनाथ सालबंदे तर उपाध्यक्षपदी (व्हा. चेअरमन) ज्ञानेश्वर होन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेचे विद्यमान चेअरमन महेबुब शेख आणि उपाध्यक्ष योगीता चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक, राहुरी यांनी बोलाविलेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी चेअरमन पदासाठी भरतरीनाथ सालबंदे व उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर होन यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब रासकर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यासाठी संस्थेचे सचिव गीताराम काळे यांनी सहकार्य केले.

चेअरमन पदासाठीची सूचना पत्रकार देविदास देसाई यांनी मांडली व बाबासाहेब जगताप यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठीची सूचना राजेंद्र जगताप यांनी मांडली तर बाळासाहेब चोखर यांनी अनुमोदन दिले.

या बैठकीस माजी चेअरमन महेबुब शेख, योगीता चव्हाण, सिताबाई खेमनर, जालिंदर चव्हाण, त्रिंबक जगताप, आसीफ शेख, रामराव होन, शशिकांत भोंगळे, पंढरीनाथ जगताप, संजय जगताप, सुभाष दाते, उपसरपंच संजय जाधव, कैलास जाधव, बबन खेमनर, रोहीदास खपके, प्रताप चव्हाण, बापुराव चव्हाण, शाम जाधव, दादासाहेब चव्हाण, प्रभाकर काळे, कल्याणराव जगताप, नारायण जाधव, नबाजी जगताप, विश्वनाथ जगताप, गेणूदास चव्हाण, दावलं शेख, राहुल खेमनर, विष्णू पांढरे, संजय चव्हाण, राजु पांढरे, लक्ष्मण चव्हाण, द्वारकानाथ चव्हाण, रमेश सालबंदे, माऊली जगताप, आनंदा बर्डे, सुरेश जगताप, प्रमोद खेमनर, संकेत लोंढे, संदीप चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव