शीतल टाईम्स //- बेलापूर ग्रामपंचायतीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तीन दिवस ध्वजारोहणाचा शुभारंभ


शीतल टाइम्स प्रतिनिधी




बेलापूर ग्रामपंचायतीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तीन दिवस ध्वजारोहणाचा शुभारंभ

बेलापूर, ता. १३ (प्रतिनिधी)
‘हर घर तिरंगा’ २०२५ अभियानानुसार शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन सुरू असून, याच अंतर्गत बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीत आज तीन दिवसांच्या ध्वजारोहण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

आजच्या पहिल्या दिवशीचा ध्वजारोहण सीआयडीचे  माजी पोलीस उपनिरीक्षक संजय भोंडगे दादा आणि पत्रकार दिपक क्षत्रीय यांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, बाबासाहेब काळे, जाकीर शेख, सचिन कणसे, दिलीप अमोलिक, राधेश्याम अंबिलवादे, महेश ओहोळ, सचिन देवरे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

सोबतच सत्यमेव जयते प्रभात ग्रुपचे सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी सचिन नगरकर, बाबासाहेब प्रधान यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला.

बेलापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि स्थानिक संघटनांच्या सहकार्याने ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, देशभक्तीचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. अंतिम टप्प्यात (१३ ते १५ ऑगस्ट) प्रत्येक घरावर, संस्थांवर आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव