शीतल टाइम्स //-बैलपोळा उत्सवात पारंपरिक बैलांबरोबर सजवलेले ट्रॅक्टरही ठरले आकर्षण

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी


 बेलापूर-ऐनतपूर येथे बैलपोळा उत्साहात: पारंपरिक बैलांबरोबर सजवलेले ट्रॅक्टरही सामील 


बेलापूर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक व ऐनतपूर येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बळीराजांनी आपल्या बैलजोडीची सजावट करून त्यांना धुपारती, नैवेद्य दाखवून हनुमान मंदिर व बाजारतळ परिसरात दर्शनासाठी आणले. नारळ फोडून पारंपरिक पद्धतीने बैलपोळ्याचा उत्सव संपन्न झाला.

ऐनतपूर येथील नवलेवस्तीवरील वीरभद्रेश्वर मंदिरातही शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची सजावट करून दर्शनासाठी आणले होते. या ठिकाणी सुभाषवाडी, कुताळवस्ती, नवलेवस्ती, बंगाळवस्ती आदी ठिकाणांहून आलेल्या शेतकरी बांधवांचा उत्साह लक्षणीय होता.

विशेष म्हणजे यावर्षी बैलांची संख्या तुलनेने कमी असून सजवलेले ट्रॅक्टर मात्र अधिक प्रमाणात दिसत होते. ट्रॅक्टरची देखील आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. बेलापूर बाजारतळ व कुर्हेवस्ती परिसरात बैल व ट्रॅक्टरची सजवलेली मिरवणूक वाजतगाजत काढली गेली. ऐनतपूर भागातही अशीच मिरवणूक काढून बैलपोळ्याचा उत्सव रंगतदारपणे साजरा करण्यात आला.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव