शीतल टाइम्स //-सारसनगरात डेंगू मुक्त अभियान संपन्न गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा –आयुक्त यशवंत डांगे

  

शीतल टाइम्स प्रतिनिधी



सारसनगरात डेंगू मुक्त अभियान संपन्न

गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा – आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर (प्रतिनिधी): 

चिकनगुनिया, हिवताप, डेंगू आणि मलेरिया यांसारखे आजार डासांमुळे होतात. सन 2023 च्या पावसाळ्यात शहरात तब्बल 98 डेंगू रुग्ण आढळले होते. मात्र, महानगरपालिकेच्या ‘डेंगू मुक्त अहिल्यानगर’ अभियानामुळे या वर्षी रुग्णसंख्या घटली असून आतापर्यंत केवळ 8 रुग्ण नोंदले गेले आहेत. 2024 मध्ये ही संख्या 78 होती. गेल्या तीन वर्षांत मलेरियाचा एकही रुग्ण शहरात आढळलेला नाही, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.



सारसनगर परिसरात झालेल्या जनजागृती अभियानात नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. “डेंगू डास स्वच्छ पाण्यात होतो. त्यामुळे घरात साठवलेले पाणी वेळोवेळी नष्ट करणे, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले.



या अभियानात आयुक्त डांगे यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, ह.भ.प. प्रभाताई भोंग, शिवाजी विधाते, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शिवाजी म्हस्के, जगन्नाथ बोडखे, डॉ. राहुल मुथा, डॉ. संदीप राऊत, डॉ. आयेशा शेख यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व आशा सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले.

माजी नगरसेवक भागानगरे म्हणाले की, “नागरिकांच्या सहभागाशिवाय कुठलाही उपक्रम यशस्वी होत नाही. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”



आशा सेविकांनी गीतांच्या माध्यमातून आजारांबाबत जनजागृती केली. कुमारी तनिष्का चंदेवय (६) हिने डासाची वेशभूषा करून आरोग्यावरील परिणाम स्पष्ट केले. तर कुमारी अस्मिता इंगळे (९) हिने गणेश आरतीतून संसर्गजन्य आजारांविषयी संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आयेशा शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश राजुरकर यांनी मानले.

(चौकट) डेंगू मुक्त अभियानाची आकडेवारी

100 कर्मचारी कार्यरत, 20 टीमची रचना

आजपर्यंत 11 आठवडे अभियान राबविले

12,000 घरांची तपासणी

36,000 पाणीसाठ्यांची पाहणी

570 दूषित पाणीसाठे आढळून नष्ट






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव