शीतल टाईम्स //- ऐनतपूर नवले वस्ती येथे श्री विरभद्रेश्वर मंदिरात ११ ते १७ ऑगस्ट धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी

       


शीतल टाइम्स प्रतिनिधी

ऐनतपूर नवले वस्ती येथे श्री विरभद्रेश्वर मंदिरात ११ ते १७ ऑगस्ट धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी

बेलापूर (प्रतिनिधी)✍️ ऐनतपूर नवले वस्ती येथील जागृत देवस्थान श्री विरभद्रेश्वर मंदिरात दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमांत पारायण, रुद्रयाग, होम-हवन, रुद्राभिषेक, डफ-वही, कीर्तन आणि महाप्रसादाचा समावेश असून, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

  • ११ ते १३ ऑगस्ट – दुपारी १२ वाजता श्री शिवलीलामृत पारायण 🚩
  • १४ ऑगस्ट – दुपारी १२ वाजता श्री मल्हारी सप्तशती पारायण🚩
  • १५ ऑगस्ट – दुपारी १२ वाजता श्री दुर्गा सप्तशती पारायण🚩
  • १६ ऑगस्ट – सकाळी ९ ते दुपारी ४ रुद्रयाग व होम-हवन 🚩(सौ. कोमल व श्री. सागर अशोक गवते, सौ. कावेरी व श्री. संतोष चंद्रकांत ओहोळ, सौ. गौरी व श्री. रविंद्र सखाराम टेकाडे या नवदांपत्यांच्या हस्ते)
  • १७ ऑगस्ट – सकाळी ६ ते ७ रुद्राभिषेक, सकाळी ७ ते ९ डफ व वही कार्यक्रम, सकाळी ९ ते १२ जाहिर हरिकीर्तन 🚩(कीर्तनकार हरिभक्त परायण रविंद्र महाराज मुठे, उक्कलगाव), कीर्तनानंतर दुपारी १२ ते ३ महाप्रसाद.🚩

या सर्व कार्यक्रमचे पौरोहित्य देवीभक्त केशवगुरु दिमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील. भक्तांनी या धार्मिक सोहळ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव