शीतल टाईम्स //- बातमीचा परिणाम! प्रवरा नदीवरील तुटलेले कठडे दुरुस्तीच्या सुचना - उपअभियंता वराळे
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बातमीचा परिणाम!
प्रवरा नदीवरील तुटलेले कठडे दुरुस्तीच्या सुचना - उपअभियंता वराळे
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
प्रवरा नदीवरील पुलाबाबतची बातमी प्रसिद्धी माध्यमांवर झळकताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. श्रीरामपूर उपविभागाचे उपअभियंता बापुसाहेब वराळे व त्यांचे सहकारी श्री. आसने यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली.
या पाहणीत पुलाचे तुटलेले कठडे त्वरित दुरुस्त करण्यासह, दुतर्फा वाढलेले गवत काढून टाकणे आणि पुलावरील पाणी वाहून जाण्यासाठी असलेली बंद झालेली छिद्रे मोकळी करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
उपअभियंता वराळे यांनी सांगितले की, पुलाची सखोल डागडुजी करण्यासाठी अंदाजे वीस लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच रेलिंगला रंग देणे व इतर आवश्यक कामे करण्यात येतील.
सदर पुलाचे बांधकाम १९६२ साली सुरू होऊन १९६८ साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आले होते. पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात विचारले असता, या पुलास समांतर चौपदरी पुल बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही वराळे यांनी स्पष्ट केले.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा