शीतल टाइम्स //-राहुरी स्थानकावर साईनगर-दादर रेल्वे थांबा
शीतल टाइम्स प्रतिनिधी
राहुरी स्थानकावर साईनगर-दादर रेल्वे थांबा
श्रीरामपूर प्रतिनिधी:
राहुरी येथील प्रवासी जनतेसाठी महत्त्वाची बातमी. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील राहुरी स्थानकावर आता साईनगर शिर्डी–दादर (गाडी क्र. 11041/11042) या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची कायमस्वरूपी सोय झाली असून, परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
माजी खासदार प्रसाद तनपुरे तसेच राहुरी व श्रीरामपूर प्रवासी संघटना यांच्याकडून हा मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने तो मान्य केला आहे.
तसेच, दौंड–निजामाबाद (गाडी क्र. 11409/11410) या गाडीला कास्टी ते चीतळी दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य रणजित श्रीगोड व डॉ. गोरख बारहाते यांनी रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना तसेच पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश जी. वर्मा यांचे आभार मानले आहेत. नुकत्याच झालेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या सभेत डॉ. बारहाते यांनी या संदर्भात विशेष चर्चा केली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा