शीतल टाइम्स //- ओबीसींनो उठा जागे व्हा, आरक्षण वाचविण्यासाठी लढायला तयार व्हा – प्रा. संतोष विरकर श्रीरामपूर येथे समता परिषद व ओबीसींची आढावा बैठक संपन्न

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


ओबीसींनो उठा जागे व्हा, आरक्षण वाचविण्यासाठी लढायला तयार व्हा – प्रा. संतोष विरकर

श्रीरामपूर येथे समता परिषद व ओबीसींची आढावा बैठक संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी) 

“ओबीसींनो उठा, जागे व्हा. पुढच्या पिढ्यांचे संरक्षण आणि उन्नती हाच आपला ध्यास असावा. त्यासाठी आपले आरक्षण अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे अधिकार आपल्याला संघर्षातून मिळाले आहेत, त्यासाठी आता लढण्याची तयारी ठेवा,” असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर यांनी केले.

शहरातील माळी बोर्डिंग येथे नुकत्याच झालेल्या समता परिषद व ओबीसी समाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड होते. जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अंकुशराव ताजणे, सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कुदळे, शिंदे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, नावाडी संघटनेचे देविदास देसाई, तेली समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ नागले, नाभिक समाजाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर वाघ, कुंभार समाज संघटनेचे बाळासाहेब दुधाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. विरकर म्हणाले की, “समता परिषद नसती तर मंडल आयोग लागू झाला नसता. आज आमचा ‘मोठा भाऊ’ ताटातला घास न खाता ताटच घेऊन पळण्याच्या तयारीत आहे. आमच्या महाज्योतीला निधी जाहीर होतो पण प्रत्यक्षात पैसा मिळत नाही; मात्र इतरांना हजारो कोटी दिले जातात. हा कुठला न्याय? राजकीय सत्ता हीच प्रगतीची मास्टर की आहे हे लक्षात ठेवून ओबीसींनी एकत्र यायला हवे.”

बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी “गाव तेथे समता परिषदेची शाखा” सुरू करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, प्रा. सुभाष लिंगायत, डॉ. राजेंद्र लोंढे, जयंत लोखंडे, डॉ. रमेश गाडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीत खोकर (ता. श्रीरामपूर) येथील नाभिक समाजातील भारतीय नौदलात दाखल झालेल्या ओंकार संजय जगताप याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बेलापूर खुर्द शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. रमेश गाडेकर तर बेलापूर बु. शाखेच्या अध्यक्षपदी सोमनाथ शिरसाठ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

यावेळी विवेक गिरमे, शरद कळमकर, भाऊसाहेब पुजारी, द्वारकानाथ बडधे, बाळासाहेब हरदास, गोपाल लिंगायत, सतीष शिरसाठ, नितीन बोरुडे आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत झुरंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश कुऱ्हे यांनी मानले.
श्रीरामपूर येथे आयोजीत ओबीसी व समता सैनिकांच्या आढावा बैठकीत उपस्थीतांना मार्गदर्शन करताना प्रदेश प्रचारक प्रा.संतोष विरकर समवेत सुभाषराव गायकवाड , प्रशांत शिंदे, अंकुशराव ताजणे, विजयराव कुदळे, संतोष डहाळे, देविदास देसाई, एकनाथ नागले, चंद्रशेखर वाघ, बाळासाहेब दुधाळे, राजु चक्रनारायण, सुरेंद्र गिरमे, चंद्रकांत झुरंगे, प्रकाश कुऱ्हे आदींसह उपस्थीत मान्यवर दिसत आहेत.(छाया-सुनिल पांढरे)





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव