शीतल टाईम्स //- ऐनतपुरजवळ बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण धष्टपुष्ट बिबट्याचे दर्शन; वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
ऐनतपुरजवळ बिबट्याचा वावर: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
धष्टपुष्ट बिबट्याचे दर्शन; वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
बेलापूर (वार्ताहर)
ऐनतपूर सुभाषवाडी रोड व अशोकनगर रोडवरील पाण्याच्या टाकीच्या अलीकडे आज शुक्रवार (दि. १२) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले यांचे बंधू नितीन नवले पाटील हे आपल्या चारचाकी गाडीतून ड्रायव्हरसह जात असताना, दिगू पाटील नाईक यांच्या शेतातून निघालेला बिबट्या सरळ रस्ता पार करून हंबीरराव नाईक पाटील यांच्या शेतात शिरला. अचानक समोर आलेला हा बिबट्या धष्टपुष्ट व मोठा असल्याने नवले पाटील व त्यांचा ड्रायव्हर यांना चांगलाच धक्का बसला.
सुदैवाने हे दोघेही चारचाकीत असल्याने अनर्थ टळला. त्याचवेळी रस्त्यावर पायी किंवा दुचाकीने प्रवास करणारे कोणी नसल्याने मोठा अपघात टाळला गेला. या रस्त्यावर नियमितपणे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी वनविभागाला पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. तसेच शाळकरी विद्यार्थी, पालक व प्रवाशांनी सावधगिरी बाळगून प्रवास करावा, असे आवाहन माजी जि.प. सदस्य शरद नवले यांनी केले आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा