शीतल टाईम्स //- बेलापूरचे सुपुत्र विलास शिंदे यांची बेंगळुरू येथे आयकर प्रधान आयुक्तपदी नियुक्ती
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूरचे सुपुत्र विलास शिंदे यांची बेंगळुरू येथे आयकर प्रधान आयुक्तपदी नियुक्ती
बेलापूर (प्रतिनिधी) – बेंगळुरू येथे आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले बेलापूर गावचे सुपुत्र विलास वसंतराव शिंदे यांची प्रधान आयुक्त (आयकर) या उच्चपदावर बढतीने नियुक्ती झाली आहे.
आहिल्यानगर जिल्ह्यातून या पदापर्यंत पोहोचणारे श्री. शिंदे हे पहिले अधिकारी ठरले आहेत.
श्री. शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय महसूल सेवा (IRS) परीक्षा उत्तीर्ण केली होती. बेलापूरमधून IRS मध्ये यश मिळविणारे ते एकमेव आहेत. कर्नाटक राज्यात आयकर आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा लौकिक असून, एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे.
त्यांच्या प्रशासकीय सेवेतल्या कामगिरीची दखल घेऊनच त्यांना प्रधान आयकर आयुक्त या पदावर बढती देण्यात आली आहे. हे पद अतिरिक्त सचिव पदाच्या समकक्ष असून, यामुळे भविष्यात भारत सरकारच्या आयकर विभागात महासंचालक, मुख्य आयकर आयुक्त किंवा सचिव या उच्च पदांसाठी त्यांना पात्रता प्राप्त झाली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर, सुनिल मुथा, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, रणजीत श्रीगोड, ज्ञानेश्वर गवले, नवनाथ कुताळ, सुनिल नवले, दिपक क्षत्रिय, दिलिप दायमा, सुहास शेलार, अतिश देसर्डा, शरद पुजारी, गोविंद साळुंके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संघटना व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“माझ्या यशाचे श्रेय मी आईवडील आणि शिक्षकांना देतो. त्यातून उतराई होण्यासाठी मी दिवंगत मातोश्रींच्या नावाने ‘पुश फॉर फिलांथ्रॉपिक अॅक्टिव्हिटीज’ हे फाऊंडेशन स्थापन करण्याचा मनोदय बाळगला आहे,”
-विलास शिंदे, प्रधान आयकर आयुक्त
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा