शीतल टाईम्स //- दहशतवाद्यांविरुद्धच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशामुळे भारताचा मान उंचावला : विंग कमांडर देवेन्द्र औताडे

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी


दहशतवाद्यांविरुद्धच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशामुळे भारताची मान उंचावली : विंग कमांडर देवेन्द्र औताडे


बेलापूर (प्रतिनिधी)

पहेलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशामुळे भारताचा जगात मान आणि शान उंचावल्याचे प्रतिपादन शौर्यपदक प्राप्त विंग कमांडर देवेन्द्र औताडे यांनी केले.

बेलापूर ग्रामपंचायत व ऐनतपूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले होते.

या प्रसंगी मान्यवरांमध्ये गणपतराव औताडे, रामभाऊ औताडे, सरपंच मिनाताई साळवी, जालिंदर कुर्हे, भास्करराव खंडागळे, भाऊसाहेब कुताळ, आभिषेक खंडागळे, विष्णुपंत डावरे, प्रफुल्ल डावरे, संजय भोंडगे, अरविंद साळवी, देविदास देसाई, दिलीप दायमा, कैलास चायल, पुरुषोत्तम भराटे, प्रविण बाठीया, रावसाहेब अमोलिक, भाऊसाहेब तेलोरे, अशोक प्रधान, जनार्दन ओहोळ, मदन सोमाणी, बंटी शेलार, असिफ बागवान, मोहसिन सय्यद, अजिज शेख, रफिक शेख, सचिन अमोलिक आदी उपस्थित होते.

औताडे म्हणाले, “पहेलगाम येथील अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या मोहिमेत जिवंत परतण्याची शक्यता केवळ सात टक्के असताना, प्राणाची बाजी लावत भारतीय जवानांनी अतिरेक्यांचे नऊ तळ उध्वस्त केले. ही कारवाई अमेरिकेसह जगाने मान्य केली. देशासमोर संकट उभे ठाकल्यावर आपण एकजुटीने मुकाबला करतो, हे भारताने जगाला दाखवून दिले.”

युवकांना संदेश देताना औताडे म्हणाले, “युद्ध हेच शौर्य नव्हे, तर वाईट विचारांवर चांगल्या विचारांनी मात करणे, आईवडिलांची व समाजाची निःस्वार्थ सेवा करणे हेही शौर्यच आहे. व्यसनांपासून दूर राहून उज्वल भविष्य आणि देशसेवेची स्वप्न बघा.”

याप्रसंगी ग्रामस्थांनी औताडे यांचा उत्साहात सन्मान केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालाजी मंदिर अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'जय शिवाजी जय भवानी' अशा घोषणा देत युवकांनी तिरंगा हातात घेऊन सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात गणपतराव औताडे, रामभाऊ औताडे, सरपंच मिनाताई साळवी, आभिषेक खंडागळे, भास्करराव खंडागळे, भाऊसाहेब कुताळ, प्रफुल्ल डावरे, संजय भोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी केले.  ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी सूत्रसंचालन केले.


********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव