शीतल टाइम्स //- संजय साळवे यांची जिल्हा व्यवस्थापन समितीवर निवड
शीतल टाइम्स प्रतिनिधी
संजय साळवे यांची जिल्हा व्यवस्थापन समितीवर निवड
श्रीरामपूर (वार्ताहर)
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कामकाजाच्या दृष्टीने नव्याने जिल्हा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली असून या समितीवर श्रीरामपूरचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
गठित समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अहिल्यानगर, उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, डॉ. अभिजीत दिवटे (प्रकल्प संचालक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र), अशासकीय सदस्य म्हणून संजय साळवे, बबन मस्के, रत्नाकर ठाणगे, तसेच सदस्य सचिव म्हणून जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांचा समावेश आहे.
संजय साळवे हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दिव्यांगांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी कार्यरत आहेत. अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र तसेच रोटरी मूकबधिर विद्यालय संचलित मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी हजारो दिव्यांगांना स्वावलंबी बनवले आहे.
त्यांच्या प्रयत्नांतून आतापर्यंत 58 दिव्यांगांना बीजभांडवल योजना, 38 जणांना जिल्हा परिषदेच्या 5% सेस फंडातून पिठाची गिरणी, 14 जणांना बॅटरी सायकली तसेच व्हीलचेअर, कुबड्या व विविध कृत्रिम साहित्य लाभार्थ्यांना मिळाले आहे. त्यांनी दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून आजपर्यंत 288 दिव्यांगांचे विवाह मोफत करून दिले आहेत.
आरोग्य शिबिरांचे आयोजन, दिव्यांग महिला सन्मान सोहळा, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना, स्वतंत्र रेशन कार्ड अशा विविध योजनांचा लाभ हजारो दिव्यांगांना मिळवून देण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच अलीमको नवी दिल्लीच्या माध्यमातून 112 दिव्यांगांना मोफत कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स उपलब्ध करून दिले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची जिल्हा व्यवस्थापन समितीवर निवड करण्यात आली असून जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा समन्वयक डॉ. दीपक अनाप आणि दिव्यांग शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने त्यांचे अभिनंदन केले आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा