शीतल टाइम्स //- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एक हजार रुपयांची वाढ : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
शीतल टाइम्स प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एक हजार रुपयांची वाढ : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
समाजातील उपेक्षित, गरीब, निराधार व दिव्यांग घटकांना दिलासा देणारा निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मिळणाऱ्या मासिक मानधनात तब्बल एक हजार रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या वाढीचा लाभ राज्यभरातील लाखो लाभार्थ्यांना ऑक्टोबर २०२५ पासून मिळणार आहे.
यापूर्वी लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये मिळत होते. शासनाने मंजूर केलेल्या नव्या निर्णयानुसार आता लाभार्थ्यांना थेट २,५०० रुपये मासिक मानधन मिळणार आहे. म्हणजेच, प्रत्येक लाभार्थ्याला महिन्याला १,००० रुपयांचा जादा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत सुमारे ४.५ लाख लाभार्थी आहेत.
श्रावणबाल सेवा योजना अंतर्गत अंदाजे २४,३०० लाभार्थी नोंदवले गेले आहेत. या दोन्ही योजनांमधून एकूण सहा लाखांहून अधिक नागरिकांना थेट फायदा होणार आहे.
या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी अंदाजे ५७० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. मात्र, “वंचित व निराधार घटकांना सन्मानाने जगण्यासाठी हा खर्च आवश्यकच आहे,” असे सरकारचे म्हणणे आहे. या योजनेतून निराधार महिला व विधवा ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अनाथ व गरजू मुले, दिव्यांग व अपंग नागरिक, कुणाच्याही आधाराशिवाय जीवन जगणारे निराधार कुटुंब आदींना मिळणार आहे.
शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांवर स्वागत होत आहे. “महागाईच्या काळात १,५०० रुपयांत जगणे अशक्य होते. वाढीमुळे किमान अन्नधान्य, औषधे यांचा खर्च भागवता येईल,” अशी प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी दिली.
समाजसेवी संस्थांनीही या निर्णयाचे कौतुक केले असून, “ही योजना आर्थिक मदतसह उपेक्षित घटकांना आधार देणारी सुरक्षा कवच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला वाढीव मानधनाचे वितरण त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबर २०२५ पासून लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव मानधन जमा होणार आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा