शीतल टाइम्स //-श्रीरामपुरात शुक्रवारी ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद मूहे मुबारक, जुलूस व भंडाऱ्याचे आयोजन
शीतल टाइम्स प्रतिनिधी
श्रीरामपुरात शुक्रवारी ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद
मूहे मुबारक, जुलूस व भंडाऱ्याचे आयोजन
श्रीरामपूर (शफीक बागवान)
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा ईद-ए-मिलाद सण शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर व तालुक्यात उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी सुरू असून विविध भागांमध्ये रोषणाई, सजावट व स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
शहरातील मुस्लिम बहुल वॉर्ड क्रमांक २ मधील सय्यद बाबा दर्गाह परिसर, वेस्टन चौक, मौलाना आझाद चौक, फतेह चौक, काजीबाबा दर्गाह, सुलतान नगर, प्रांत कार्यालयामागील हुसेननगर, कुरेशी मोहल्ला, गुलशन चौक, मिल्लतनगर, फातेमा हाऊसिंग सोसायटी, गोंधवणी रोड आदी ठिकाणी घराघरांवर विद्युत रोषणाई केली असून हिरवे झेंडे, पताका यामुळे परिसर दिमाखदार दिसत आहे. मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने वातावरण सणावाराचे झाले आहे.
इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल अव्वल’ महिन्याच्या १२ तारखेला पैगंबर जयंती साजरी केली जाते. त्यानुसार श्रीरामपूरात शुक्रवार सकाळी ८ वाजता मौलाना आझाद चौकातील जामा मशीदीतून जुलूस निघणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून तो दुपारी १२ वाजेपर्यंत पुन्हा जामा मशीदीत पोहोचेल. त्यानंतर भंडाऱ्याचे आयोजन असून, शुक्रवारच्या नमाजानंतर मुहे मुबारकचे दर्शन घडविण्यात येणार आहे, अशी माहिती मौलाना इमदाद अली व जामा मशीद विश्वस्तांनी दिली.
बेलापूर पंचक्रोशीतही पैगंबर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असून, घरे-दुकाने रोषणाईने सजविली आहेत. अनेक सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा संदेश व्हॉट्सअॅपवर पाठविले जात आहेत. श्रीरामपूर, बेलापूर, एकलहरे, टिळकनगर, पढेगाव, टाकळीभान येथे सजावटीचे काम अंतिम टप्प्यात असून, हिरवे झेंडे, पताका व विद्युत माळांनी बाजारपेठ गजबजली आहे. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वत्र सणाचा उत्साह दिसून येत आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा