शीतल टाइम्स //- सांगली अधिवेशनासाठी हजारो कार्यकर्ते जाणार: संजय संसारे
शीतल टाइम्स न्यूज नेटवर्क
सांगली अधिवेशनासाठी हजारो कार्यकर्ते जाणार: संजय संसारे
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. ७ सप्टेंबर) सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या राज्य अधिवेशनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे पहिले संयुक्त राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन लिंगायत धर्मगुरू प.पू. कोरनेश्वर स्वामी यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. ओहोळ राहणार आहेत.
रविवारी सकाळी १०.३० वाजता सुरू होणाऱ्या या अधिवेशनात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व कर्मचारी वर्गाशी निगडीत विविध महत्त्वाचे विषय चर्चेसाठी घेण्यात येणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची नोंदणी झाली असून, हजारो कार्यकर्ते या अधिवेशनासाठी रवाना होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या अधिवेशनामुळे संघटनेच्या कार्याचा नवा टप्पा सुरू होणार असून, इतिहासातील हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास राज्याध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष इंजी. राज दिवेकर, शिवाजी भोसले, गणपतराव मोरे यांनी व्यक्त केला.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा