शीतल टाइम्स //- अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळ्यासाठी बेलापूरमध्ये हरिहर फाऊंडेशनचा “स्वच्छ प्रवरामाई” उपक्रम
शीतल टाइम्स प्रतिनिधी
अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळ्यासाठी बेलापूरमध्ये हरिहर फाऊंडेशनचा “स्वच्छ प्रवरामाई” उपक्रम
बेलापूर (प्रतिनिधी)
उद्या शनिवार, दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन सोहळ्यासाठी बेलापूरमध्ये जोरदार तयारी सुरू असून हरिहर फाऊंडेशन आणि कानिफनाथ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ प्रवरामाई” उपक्रम राबविण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन व गावाची स्वच्छता या त्रिसूत्रीवर भर देत यंदाचा उपक्रम आखण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून होणार आहे. सकाळी १०.३० पासून मूर्ती व निर्माल्य संकलनाची सेवा सुरू होईल. यासाठी विशेष ट्रॅक्टर-ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली असून, गावातील प्रमुख चौकांवर स्वयंसेवक नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. विसर्जनानंतर मूर्तीतील साहित्य, पूजावस्तू व फुलांचे निर्माल्य हे नदी-नाल्यात न टाकता वेगळे संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले जाणार आहे.
संध्याकाळी ५ वाजता झेंडा चौक येथे ग्रामपंचायत बेलापूर आणि वि.वि. कार्यकारी सोसायटीतील कामगारांच्या शुभहस्ते श्रींची आरती करण्यात येणार आहे. आरतीनंतर मिरवणूक निघून पाण्याच्या टाकीजवळ तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन केले जाईल. या कृत्रिम तलावामुळे नदीतील प्रदूषण रोखण्यास मदत होणार असून, ग्रामस्थ व तरुणांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्वागत केले आहे.
झेंडा चौक येथून सुरू होणारी ही मिरवणूक अरुण कुमार वैद्य पथ, केशव गोविंद मंदिर, पेठमार्गे पुन्हा झेंडा चौकात येईल आणि तेथून विसर्जन स्थळी पोहोचेल.
'स्वच्छ प्रवरामाई' या उपक्रमाला पाठिंबा देत, नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी, ७२४९७२१०३३ किंवा ९५७९४२१६५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा