शीतल टाइम्स //-उक्कलगावात इंद्रनाथ पाटील थोरात यांचा सत्कार गुंडांचा कायमचा बंदोबस्त करू- उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांची ग्वाही
शीतल टाइम्स प्रतिनिधी
उक्कलगावात इंद्रनाथ पाटील थोरात यांचा सत्कार
गुंडांचा कायमचा बंदोबस्त करू- उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांची ग्वाही
बेलापूर (प्रतिनिधी)
समाजातील प्रतिष्ठित व चांगल्या व्यक्तींना जर कुणी त्रास दिला किंवा हल्ला केला, तर अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असून, ती जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू, अशी ठाम ग्वाही श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली.
उक्कलगाव येथील खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर काही दिवसांपूर्वी गावकुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी संपूर्ण गावकऱ्यांनी एकी दाखवत निषेध नोंदविला. तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही घटनेत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर यांच्या उपस्थितीत थोरात यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना भवर म्हणाले की, "उक्कलगाव हे आदर्श, राजकारण विरहित आणि एकोप्याचे गाव आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीवर हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील."
या वेळी बोलताना इंद्रनाथ पाटील थोरात म्हणाले, "राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असताना माझ्यावर प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिली वेळ आहे. हल्ल्याच्या वेळी व त्यानंतर सर्वजण माझ्या मदतीला धावून आले. त्यामुळेच मी वाचलो आणि या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळाले. याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे."
कार्यक्रमात हल्ल्यावेळी मदतीला धावून आलेले सतीश बोर्डे, विलास बोर्डे, विजय बोर्डे, विकास बोर्डे, जालिंदर बोर्डे, मा. चेअरमन प्रकाश जगधने, सचिव शिवाजी थोरात, पत्रकार देविदास देसाई यांच्यासह अनेकांना सन्मानित करण्यात आले. तसेच शिंदुर ऑपरेशनमध्ये विशेष कामगिरी बजावून शौर्यपदक मिळवलेले वायुदलाचे अधिकारी देवेंद्र औताडे यांचाही सत्कार झाला.
या प्रसंगी शुभम महाराज खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गोडगे, माजी सभापती पी.आर. शिंदे, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब पाटील थोरात, अॅड. दादासाहेब अवताडे, विजय मुंडे, चंपालाल भोपळे, ह.भ.प. उल्हास महाराज तांबे, उक्कलगाव सरपंच रवीना शिंदे, सोसायटीचे चेअरमन श्रीकांत जगधने, अॅड. संदीप चोरगे, डॉ. एकनाथ ढोणे, तुकाराम शिंदे, जालिंदर लवांडे, पोलीस पाटील हिराबाई रजपूत तसेच सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विकास पाटील थोरात यांनी केले तर व्हा. चेअरमन पुरुषोत्तम थोरात यांनी आभार मानले.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा