शीतल टाइम्स //- मतमाऊली यात्रेस जाणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद वाटप व भोजनाचे आयोजन

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी



मतमाऊली यात्रेस जाणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद वाटप व भोजनाचे आयोजन

बेलापूर (प्रतिनिधी): 

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सुरू असलेल्या मतमाऊली यात्रेनिमित्त भाविक भक्तांसाठी बेलापूर व परिसरात भोजन व प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले.

यात्रेच्या आदल्या दिवशी (दि. 12 सप्टेंबर) पायी जाणाऱ्या भाविकांसाठी संस्कृती मंगल कार्यालय, बेलापूर येथे मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी शेकडो भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी संस्कृती मंगल कार्यालयाचे मालक भरत साळुंके यांनी आपले कार्यालय दरवर्षीप्रमाणे विनामूल्य उपलब्ध करून दिले.

यात्रेच्या मुख्य दिवशी बेलापूर–श्रीरामपूर रोडवर स्टॉल उभारून खिचडी, राजगिरा लाडू, केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. हा उपक्रम बेलापूर येथील मतमाऊली भक्तांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, माजी सरपंच भरत साळुंके, श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रा. निजाम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, बेलापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष भास्करराव खंडागळे पत्रकार देवदास देसाई,  माजी अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती प्रकाशराव कुऱ्हे, माजी उपसरपंच प्रकाश पाटील नाईक, पोलीस पाटील अशोक प्रधान, विक्रम नाईक, माजी चेअरमन बेलापूर सेवा संस्था भास्कर बंगाळ, माजी पोलीस पाटील शिवाजी पाटील वाबळे, तानाजी शेलार सर, सुभाष अमोलिक, रमेश शेलार, सुरेश यादव सर, रावसाहेब अमोलिक, बाबासाहेब शेलार, भाऊसाहेब तेलोरे, सुरेश अमोलिक, दादासाहेब कुताळ, महेश कुऱ्हे, पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा, अरुण अमोलिक, मधुकर ठोंबरे, नीतीन खोसे, बंटी शेलार, सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शंकरराव पगारे, प्रल्हाद अमोलिक, दिलीप अमोलिक, संतोष अमोलिक, जयश्री अमोलिक, नंदाताई पवार, आकांक्षा अमोलिक, विश्वास अमोलिक, सचिन अमोलिक यांच्यासह बेलापूर व ऐनतपूर येथील मतमाऊली भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.














********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव