शीतल टाइम्स //-श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई: १०० दुचाकींवर कारवाई, शहरात शांततेसाठी प्रयत्न

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी



शीतल टाइम्स

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई: १०० दुचाकींवर कारवाई, शहरात शांततेसाठी प्रयत्न

बेलापूर (प्रतिनिधी): 

श्रीरामपूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या मोहिमेत विना नंबर प्लेट आणि कर्णकर्कश आवाजाचे मॉडिफाय सायलेन्सर लावलेल्या सुमारे १०० दुचाकींवर कारवाई करण्यात आली, ज्यामुळे अनेक वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या कारवाईत एकूण ९७ वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये ४८ दुचाकी विना नंबर प्लेट आढळल्या, ज्या तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या. पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आणि जागेवरच नंबर प्लेट बसवून घेण्याचे आदेश दिले.

याशिवाय, ६ दुचाकींवर विनापरवाना लावलेले कर्णकर्कश आवाजाचे मॉडिफाय सायलेन्सर आढळले. पोलिसांनी हे सायलेन्सर काढून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवून त्या गाड्या सोडल्या. अशाप्रकारे, शहरात शांतता राखण्याचा आणि बेकायदेशीरपणे बदल केलेल्या वाहनांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मॉडिफाय सायलेन्सरमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तसेच, विना नंबर प्लेटच्या गाड्या अनेकदा गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ही कारवाई आवश्यक होती.

पोलिसांनी सर्व दुचाकीधारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या वाहनांना योग्य नंबर प्लेट लावल्या आहेत आणि मॉडिफाय सायलेन्सरचा वापर करत नाहीत याची खात्री करावी, अन्यथा भविष्यातही अशीच कठोर कारवाई केली जाईल.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव