शीतल टाइम्स //- बेलापूर ग्रामपंचायतीतर्फे शिक्षकांचा सत्कार
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर ग्रामपंचायतीतर्फे शिक्षकांचा सत्कार
बेलापूर प्रतिनिधी:
बेलापूर-ऐनतपूर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील बदली झालेल्या तसेच नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सत्कार बेलापूर बु. ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, "प्राथमिक शाळा हे संस्कारांचे पहिले व्यासपीठ आहे. बदली झालेल्या शिक्षकांनी उत्तम कामगिरी केली असून, नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार घडवावेत."
बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "चांगले कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार आणि नव्या शिक्षकांचे स्वागत करणे ही आपली परंपरा आहे. जिल्हा परिषद शाळेचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत होण्यासाठी नवीन शिक्षक निश्चितच योगदान देतील."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोंडगे दादा होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, सरपंच सौ. मीना साळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष अमोलिक, गणेश बंगाळ, अॅड. अरविंद साळवी, रवी कुताळ, दादासाहेब कुताळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू सय्यद, शाहरुख शेख, गणेश तेलोरे, उपसरपंच दिपाली अमोलिक, श्रीकांत अमोलिक, सागर साळवे, प्रशांत अमोलिक, निलेश अमोलिक, शेखर अमोलिक, मंगेश नजन, प्रतिक अमोलिक, पास्टर घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकवर्ग यांचीही उपस्थिती लाभली.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा