शीतल टाइम्स //- साईबाबा परिसरात भीक मागणाऱ्या मुलांची सुटका: पालकांवर गुन्हा दाखल भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची धडक कारवाई
शीतल टाइम्स प्रतिनिधी
साईबाबा परिसरात भीक मागणाऱ्या मुलांची सुटका: पालकांवर गुन्हा दाखल
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची धडक कारवाई
बेलापूर (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील शिर्डीतील श्री साई मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या 12 अल्पवयीन मुलांची पोलिसांनी सुटका करून त्यांना बाल सुधारगृहात दाखल केले आहे. विशेष म्हणजे, या मुलांना भिक्षा मागण्यास आणि वस्तू विक्रीस भाग पाडणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीत प्रथमच झालेल्या या कारवाईचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या मोहिमेत एकूण 12 मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने या मुलांची संगमनेर व श्रीरामपूर येथील आधारगृहात रवानगी केली आहे.
फक्त मुलांची सुटका करून कारवाई थांबवली नाही, तर त्यांच्या पालकांविरुद्धही बाल न्याय अधिनियम कलम 75 व 76 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असून पोलिसांकडून पालकांना अटक करण्याची कारवाई सुरू होणार आहे.
साई मंदिर परिसरात अल्पवयीन मुले भीक मागणे, हारतुरे, फुले, फोटो विक्री अशा कामांत गुंतलेली दिसत होती. त्यांना पालकांकडून जबरदस्ती करून या कामांत लावले जात होते. काही प्रकरणांत ही मुले नशा करून भाविकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांत शिर्डीत अल्पवयीन मुलांकडून विविध गुन्हे घडल्याची नोंद असल्याने भाविकांची सुरक्षितता व शिर्डीचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी ही धडक मोहीम राबवली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी सांगितले.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा