'शीतल टाईम्स' - बेलापूरात इस्रोची स्पेस ऑन व्हील्स कार्यशाळा 'शीतल टाईम्स' प्रतिनिधी
बेलापूरात इस्रोची स्पेस ऑन व्हील्स कार्यशाळा 'शीतल टाईम्स' प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर:-भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान, बेलापूर यांच्या विशेष प्रयत्नाने राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०. ३० ते सायंकाळी ७. ०० वाजेपर्यंत आझाद मैदान बेलापूर बुद्रुक येथे इस्त्रो स्पेस ऑन व्हील हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप साळुंके, अँड. मयुर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके यांनी दिली. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना श्री साळुंके म्हणाले की, बेलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अद्ययावत घडामोडींची ओळख करून देण्यासाठी सदरच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्रो(ISRO) बसद्वारे विविध उपक्रम सादर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला पंख दे...