शीतल टाईम्स //फॅन्सी नंबर व विना नंबर असलेल्या दुचाकी वर पोलिसांची कारवाई शीतल टाईम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी फॅन्सी नंबर व विना नंबर असलेल्या दुचाकी वर पोलिसांची कारवाई शीतल टाईम्स प्रतिनिधी बेलापूर( प्रतिनिधी)- बेलापूर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळा रंगाच्या फिल्म लावून बेकायदेशीर रित्या फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळा रंगाचे फिल्म लावून बेकायदेशीर फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी दिवसभर ही मोहीम राबवली. त्यामध्ये अनेक दुचाकी या विना नंबरच्या तसेच फॅन्सी नंबर असलेल्या आढळून ...