शीतल टाईम्स // बेलापूर गावकरी मंडळाच्या वतिने शनैश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा हगामा शीतल टाईम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर गावकरी मंडळाच्या वतिने शनैश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा हगामा शीतल टाईम्स प्रतिनिधी बेलापूरः येथील शनैश्वर यात्रेनिमित्त गावकरी मंडळाचेवतीने मंगळवार २७ मे रोजी कुस्त्यांचा हगामा आयोजित करण्यात आला आहे. सदर कुस्त्यांच्या हगाम्यात कोल्हापूर, सोलापूर, अहिल्या नगर, गंगापूर, नेवासा, कोपरगाव आदी ठिकाणासह विविध जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपटू सहभागी होणार असल्याची माहिती जि.परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली. शनैश्वर याञेच्या निमित्ताने गावकरी मंडळाने गेल्या वर्षापासून खंडीत झालेली कुस्त्याच्या हगाम्याची परंपरा पूर्ववत सुरु केली. प्रथेनुसार सोमवार (ता.२६) रोजी पहाटे ४वा. शनैश्वर महाराजांना पारंपारिक अभिषेक संपन्न होईल. त्यानंतर मंगळवार (ता.२७) रोजी दुपारी ४ वा. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानावर कुस्त्यांचा हगामा आयोजित करण्यात आला आहे. हगाम्या मध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांना योग्य ती बिदागी देण्यात येणार आहे. ...