शीतल टाईम्स //बेलापूर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी अतिशय उत्साहात साजरी शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

बेलापूर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी अतिशय उत्साहात साजरी शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर ग्रामस्थ व समस्त तिळवण तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी कार्यक्रम यानिमित्ताने श्री संत शिरोमणी संताजी महाराज मंदिर बेलापूर येथे सकाळी ८.०० वाजता पुण्यतिथी निमित्ताने सत्यनारायण पुजा अणि महाअभिषेक पूजा श्री. व सौ. अजिंक्य पुरुषोत्तम साळुंके आणि श्री. व सौ. गोकुळ रामेश्वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर पारंपरिक पद्धतीने थाटामाटात, वाद्यांच्या सघोषात, अश्वरथामध्ये स्वार होऊन संत शिरोमणी संताजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक पूर्ण गावामध्ये, झेंडा चौक तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथून चैतन्यपूर्ण वातावरणात काढण्यात आली. त्यावेळेस सर्व समाज बांधव, गावातील ग्रामस्थ, सर्वच जेष्ठ-श्रेष्ठ-युवा त्यावेळेस मिरवणुकी दरम्यान उपस्थित होते. संपूर्ण गावातील वातावरण अतिशय चैतन्यमयी झाले होते. "जय संताजी" च्या उद्घोषणाने गावातील संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झाले ह...