शीतल टाईम्स //बेलापूरात बालकांनी साकारला विविध सामाजिक संदेशांसह ख्रिस्त जन्माचा जिवंत देखावा शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

बेलापूरात बालकांनी साकारला विविध सामाजिक संदेशांसह ख्रिस्त जन्माचा जिवंत देखावा


शीतल टाइम्स प्रतिनिधी

बेलापूर बुद्रुक येथील तेलोरे चावडी येथे नाताळ सणानिमित्त बालकांनी बाळ येशू ख्रिस्ताचा जिवंत देखावा सादर केला. या देखाव्यात बालकांनी विविध प्रकारचे संदेशाचे फलक झळकावले. बालकांनी सादर केलेल्या जिवंत देखावा बघताच अनेकांनी बाळ येशू , माता मारिया, योसेफ, देवदूत, राजा, मेंढपाळ यांचं प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव घेतला.
यावेळी देखाव्यामध्ये आकाशात देवदूत, जमिनीवर झोपडीतील गव्हाणीत बाळ येशू सह माता मारिया, पिता योसेफ, समोरुन राजा व त्याचे सहकारी घोड्यावर स्वार झालेले, मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यासह,  खरीखुरी शेकोटी, गाढवं, शेती, रस्ते, डोंगर, झाडी आणि प्रशस्त रांगोळी आदी सर्व प्रत्यक्षात साकार करण्यात आले होते.


देखाव्याच्या भोवताली बालकांनी आपल्या हातात सामाजिक संदेशाचे फलक झळकावले. उदाहरणार्थ "झाडे लावा, झाडं जगवा, पृथ्वी वाचवा",  पाणी वाचवा, जीवन वाचवा, मुलगी शिकली, प्रगती झाली, "सर्वधर्म समभाव", अशा संदेशासह बायबल मधील देवाची वचने सादर करण्यात आली. यावेळी अनेक भाविक भक्तांनी, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गर्दी केली होती. अनेकांनी बालकांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

बाळ येशू ख्रिस्त जन्म जिवंत देखाव्यात उदय तेलोरे, तेजस तेलोरे, संदेश तेलोरे, सागर तेलोरे, श्लोक तेलोरे, आयुष तेलोरे, आशिष तेलोरे, प्रतिक तेलोरे, विशाल तेलोरे, सतेज तेलोरे, अंशुमन शेलार, अनुष बनसोडे, विद्या बनसोडे, अनुष्का तेलोरे, पायल तेलोरे, समिक्षा तेलोरे, आर्या खरात, पुनम तेलोरे यादी बालकांनी सहभाग घेतला
सदर देखावा कार्यक्रम सादर करण्यासाठी रजनीकांत तेलोरे, सुधीरकुमार तेलोरे, भाऊसाहेब तेलोरे, सागर खरात, अमोल तेलोरे, आशाबाई तेलोरे, तेरिजा तेलोरे, प्रज्ञा तेलोरे, सोनीताई तेलोरे, ताई खरात, कविता तेलोरे यादींसह अनेकांनी परिश्रम घेतले.

या बाळ येशू ख्रिस्त जन्माच्या जिवंत देखाव्यास जि.प.सदस्य शरदराव नवले, सरपंच स्वातीताई आमोलिक, उपसरपंच तबसुम बागवान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे, मुश्ताकभाई शेख आदींसह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. श्री.खंडागळे गुरुजी, सिस्टर लुईजा, सिस्टर सिसीली, सिस्टर प्रभा, सिस्टर रिटा, सिस्टर जॅकेलिन, सौ.दुशिंग, श्री. व सौ. पंडित, यादींनी संपूर्ण धर्म प्रांतात प्रत्यक्ष भेटी देऊन स्पर्धेत सहभागी गव्हाणींचं परिक्षण केले. उत्कृष्ट गव्हाणीस बक्षीस देण्यात येणार आहे.



*********************************
*********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*********************************
*********************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी