शीतलटाईम्स - समता स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धा कौतुकास्पद -ससाणे शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)
समता स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धा कौतुकास्पद -ससाणे शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी) समता स्पोर्टस् क्लब गेल्या तीस वर्षापासुन अखंडपणे नाताळ व नव वर्षाच्या निमित्त विविध स्पर्धा आयोजीत करत असुन बौध्दीक स्पर्धेच्या काळात भरविलेल्या धावण्याच्या स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांनी व्यक्त केले. समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने नाताळ व नव वर्षाचे औचित्य साधुन धावण्याच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला मागील वर्षी कोरोनामुळे या स्पर्धेत खंड पडला होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संविधान हिवराळे (बाळापूर अकोला), द्वितीय क्रमांक विक्रम बोराडे (नगर), तृतीय क्रमांक देशमुख राहुल (श्रीरामपूर), चतुर्थ क्रमांक खंडागळे प्रदिप भारत (टाकळीभान), तर उत्तेजनार्थ पाचवा आणि सहावा क्रमांक अनुक्रमे अजय साबळे (खैरी), भानगुडे विजय (बोधेगाव) यांनी मिळवला. सदर स्पर्धेचे उद़्घाटन उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते तसेच, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गु...