शीतलटाईम्स - श्रीरामपुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

 


श्रीरामपुरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

शीतलटाईम्स । बेलापुर  (प्रतिनिधी)  

श्रीरामपुरात पहीला ओमीक्रॉनचा रुग्ण आढळला असुन ज्यांनी अजुनही कोविड लसीचा पहीला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी ताबडतोब लस घ्यावी असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

नायजेरीयाहुन दोन नागरीकांचे श्रीरामपुर तालुक्यात आगमन झाले होते त्याच्या आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या होत्या त्या पॉझिटीव्ह आल्या त्यामुळे दोघाच्याही ओमीक्रॉन टेस्ट करण्यात आल्या असुन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे श्रीरामपुराकरांचा जिव टांगणीला लागलेला आहे.

कोविड लसीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून लसीकरण करुन घेण्यास नागरीकांचा उत्साह कमी आहे लस सर्वत्र उपलब्ध आहे तरी देखील काही नागरीक लस घेत नाही त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुक्यातील जनतेला अवाहन केले आहे की कोविड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असुन नागरीकांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे घरी गेल्यावर हात स्वच्छ धुवा आपली काळजी आपणच घ्या आपण सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.




****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी