शीतलटाईम्स - शब्दगंध साहित्य परिषद, लोकरंग व वडाळा महादेव संस्थेच्या वतीने नाना डोंगरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान आमदार लहू कानडे यांनी केले डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)
शब्दगंध साहित्य परिषद, लोकरंग व वडाळा महादेव संस्थेच्या वतीने नाना डोंगरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
आमदार लहू कानडे यांनी केले डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक
शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)
शब्दगंध साहित्य परिषद श्रीरामपूर शाखा, लोकरंग बहूउद्देशीय संस्था व वडाळा महादेव संस्था संचलित करिअर कॉम्युटरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना आमदार लहू कानडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अशोकनगर फाटा (ता. श्रीरामपूर) येथील इच्छामणी मंगल कार्यालयात झालेल्या झालेल्या कार्यक्रमात डोंगरे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव निकम, श्रीरामपूर पंचायत समिती सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, कवियत्री शर्मिला गोसावी, हरिभाऊ नजन, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, धोंदीरामसिंह राजपूत, साहित्य परिषद श्रीरामपूर शाखेचे अध्यक्ष शेख मिराबक्ष बागवान, सचिव लोककवी आनंदा साळवे, शेख रफिक बागवान, कॉ. बाबा आरगडे, भगवान राऊत आदी उपस्थित होते.
विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, कवी व युवकांचे संमेलनाचे या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमात वैजापूरचे धोंदीरामसिंह राजपूत यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभुषा परिधान करुन सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आमदार लहू कानडे यांनी पै. नाना डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील धस यांनी केले. आभार आरिफा शेख यांनी मानले. जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शब्दगंध साहित्य परिषद श्रीरामपूर शाखा, लोकरंग बहूउद्देशीय संस्था व वडाळा महादेव संस्था संचलित करिअर कॉम्युटरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना आमदार लहू कानडे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव निकम, श्रीरामपूर पंचायत समिती सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, कवियत्री शर्मिला गोसावी, हरिभाऊ नजन, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, धोंदीरामसिंह राजपूत, साहित्य परिषद श्रीरामपूर शाखेचे अध्यक्ष शेख मिराबक्ष बागवान, सचिव लोककवी आनंदा साळवे, शेख रफिक बागवान, कॉ. बाबा आरगडे, भगवान राऊत आदी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा