शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर!

बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

शीतल टाइम्स प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक हि विखे-मुरकुटे-ससाणे अशा युतीने लढविली. माञ सत्ता मिळताच सभापती सुधीर नवले यांना संस्थेच्या वाटचालीस मोलाचे योगदान असणाऱ्या  महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विसर पडला आहे. सभापती हे प्रभारी सचिवांना हाताशी धरुन बहुमतच्या जोरावर मनमानी कारभार करीत आहेत. याच्या निषेधार्थ विखे गटाच्या सदस्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात नाम.विखे गटाचे उपसभापती अभिषेक खंडागळे,माजी सभापती नानासाहेब पवार,गिरीधर आसने,नानासाहेब शिंदे,सौ. सरला बडाख आदिंनी बाजार समितीच्या सर्वसाधारण बैठकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहिर केले आहै.याबाबत प्रसिध्दीसाठी दिलेल्या पञकात म्हटले आहे की ,बाजार समितीची निवडणुक नाम.राधाकृष्ण विखे,माजी आ.भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली लढविली गेली.सुधीर नवले हे सभापती तर अभिषेक खंडागळे उपसभापती झाले.                          प्रत्यक्षात कारभार करताना माञ सभापती व त्यांच्या समर्थक संचालकांना नामदार विखे यांचा विसर पडला आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वार्षिक अहवालात महसूलमंञी नामदार विखे पाटील यांचा फोटो जाणिवपूर्वक छापण्यात आला नाही. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे संस्थेच्या वाटचालीमध्ये मोठे योगदान आहे.त्यांचे संस्थेला कायम सहकार्य राहिलेले आहे. असे असताना त्यांचा फोटो अहवालात न टाकणे हा राज्याचे मंञी असणा-या नाम.विखे यांचा अवमान आहे.हा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही.सभापती नवले हे बाजार समितीला सवतासुभा समजून कारभार करीत आहेत.अनेक महत्वाचे निर्णय अंधारात ठेवून घेतले जातात.सध्या बाजार समितीचे सभापती हवेत असल्यागत वागत आहेत.सभापती व प्रभारी सचीव यांचा संगनमतने मनमानी कारभार सुरु असुन संचालकांना विश्वासात घेतले जात नाही..हा प्रकार गैर असल्याने आम्ही ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसधारण बैठकीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवित असल्याचे या संचालकांनी स्पष्ट केले आहे.



***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध