शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध


शीतल टाइम्स प्रतिनिधी

📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध


बेलापूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष, पंचायत समितीचे माजी सभापती व सामाजिक राजकीय नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी बेलापूर पोलिसांकडे केली.


इंद्रनाथ पाटील थोरात हे नगरहून घरी परतत असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीला दुसरी गाडी आडवी लावून अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


या पार्श्वभूमीवर उक्कलगाव येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती आबासाहेब थोरात होते. यावेळी बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, पी.आर. शिंदे, युवराज थोरात, किशोर कर्डीले, दत्तात्रय जगधने, सुनिल पाटील थोरात, बाबासाहेब थोरात, रवींद्र थोरात, मधुकर भोसले, सरपंच रविना शिंदे, गुलाब गाडेकर, सर ज्ञानदेव थोरात, नवनाथ धनवटे, शरद नवले, अभिषेक खंडागळे, बी.बी. थोरात, अशोक नाना थोरे, अनिल थोरात, भरत साळुंखे, देविदास देसाई, शरद थोरात, बाबासाहेब मोरे, किशोर थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




निषेध सभेनंतर ग्रामस्थ बेलापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेले. यावेळी नागरिकांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.


यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन भाऊ गुजर, अरुण पाटील नाईक, ॲड. हेमंत थोरात, सुभाष जंगले, खटोड पत संस्थेचे चेअरमन  रवींद्र खटोड आदींनीही आपली मनोगते व्यक्त करत निषेध नोंदवला.


या संपूर्ण निषेध आंदोलनाचे सूत्रसंचालन विकास पाटील थोरात यांनी केले. कार्यक्रमास उक्कलगाव-बेलापूर परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी