पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतल टाईम्स - दिवाळी अंक काढणे संपादकांसाठी खूपच खडतर - उपपरिवहन अधिकारी जोशी शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

इमेज
दिवाळी अंक काढणे संपादकांसाठी खूपच खडतर - उपपरिवहन अधिकारी  जोशी शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी दिवाळी अंक काढणे संपादकांसाठी खूपच खडतर असते. नवीन लेखकांसाठी दिवाळी अंक एक व्यासपीठ असल्याने साहित्य प्रसिद्ध होणे ही बाब नवीन लेखकांना आनंददायी बाब असते. कारण नवीन लेखकांना दिवाळी अंकात सर्व प्रथम स्थान मिळते. दिवाळी अंकातूनच प्रथितयश लेखक घडतात. असे प्रतिपादन श्रीरामपूर उपप्रादेशीक कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले. सा. शीतल टाईम्स दिवाळी अंक २०२४ चे प्रकाशन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. श्रीरामपूर येथील साप्ताहिक शीतल टाईम्स या वृत्तपत्राचा दिवाळी अंक २०२४ चा प्रकाशन सोहळा श्रीरामपूर येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालय येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी साप्ता. शीतल टाईम्सचे संपादक तथा संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र मधुकर लचके, शीतल टाईम्सचे उपसंपादक सुहास शेलार, जिल्हा प्रतिनिधी शकील (बाबा) शेख यांचेसह पोलीस उपप्रदेशीक कार्यालयातील अधिकारी उ...

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

इमेज
बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले  शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील पाथरे येथून चोरीस गेलेली मोटरसायकल बेलापूर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीसह पकडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बेलापूर दुरुक्षेत्र इनचार्ज सपोनी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक इसम चोरी केलेली मोटरसायकल ही बेलापूर हद्दीत घेऊन येत आहे. त्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी बेलापूर क्षेत्र येथे असलेले पोलीस कॉन्स्टेबल बडे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे यांना बातमीतील हकीगत सांगून नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या मोटर सायकलची चौकशी करून त्यास ताब्यात घेण्याचा आदेश दिला. नमूद इसमास बेलापूर ते पडेगाव रोडवर थांबून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राज अनिल लोंढे वय 19 वर्षे, राहणार भेर्डापूर, तालुका श्रीरामपूर असे सांगीतले.  त्याच्याकडे असलेली बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकलसह त्यास ताब्यात घेऊन बेलापूर दूरक्षेत्र येथे आणले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर...

शीतल टाईम्स - दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूरात खरेदी महोत्सवाचे आयोजन शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

इमेज
दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूरात खरेदी महोत्सवाचे आयोजन                     शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी येथील ग्रामपंचायत, मर्चन्ट असोशिएशन व किराणा मर्चन्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापार आणि व्यवसाय वृध्दीच्या हेतूने 'बेलापूर खरेदी महोत्सव' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  बेलापूर येथे  १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधित सदरचा खरेदी महोत्सव संपन्न होणार आहे. या खरेदी महोत्सवात सहभागी होण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार आदिंनी आज  दि.२ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून कुपन संख्या नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदरचा उपक्रम बेलापूरच्या बाजारपेठेला उर्जितावस्था मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित केला आहे. हा उद्देश लक्षात घेवून नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतच दसरा-दिवळी सणांची खरेदी करुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन ग्रामपंचायत, मर्चन्ट व किराणा मर्चन्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी क...