शीतल टाईम्स - दिवाळी अंक काढणे संपादकांसाठी खूपच खडतर - उपपरिवहन अधिकारी जोशी शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

दिवाळी अंक काढणे संपादकांसाठी खूपच खडतर - उपपरिवहन अधिकारी  जोशी

शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी

दिवाळी अंक काढणे संपादकांसाठी खूपच खडतर असते. नवीन लेखकांसाठी दिवाळी अंक एक व्यासपीठ असल्याने साहित्य प्रसिद्ध होणे ही बाब नवीन लेखकांना आनंददायी बाब असते. कारण नवीन लेखकांना दिवाळी अंकात सर्व प्रथम स्थान मिळते. दिवाळी अंकातूनच प्रथितयश लेखक घडतात. असे प्रतिपादन श्रीरामपूर उपप्रादेशीक कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले. सा. शीतल टाईम्स दिवाळी अंक २०२४ चे प्रकाशन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. श्रीरामपूर येथील साप्ताहिक शीतल टाईम्स या वृत्तपत्राचा दिवाळी अंक २०२४ चा प्रकाशन सोहळा श्रीरामपूर येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालय येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी साप्ता. शीतल टाईम्सचे संपादक तथा संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र मधुकर लचके, शीतल टाईम्सचे उपसंपादक सुहास शेलार, जिल्हा प्रतिनिधी शकील (बाबा) शेख यांचेसह पोलीस उपप्रदेशीक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी साप्ता. शीतल टाईम्सचे संपादक तथा संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र मधुकर लचके म्हणाले कि, समाज सुधारण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून लेखकांच्या शब्दाला मोल आहे. दिवाळी अंकाशिवाय साहित्य पूर्ण होत नाही. दिवाळी अंक समाजात प्रकाश पसरविण्याचे कार्य करतात.

शीतल टाईम्स उपसंपादक सुहास शेलार म्हणाले कि, दिवाळी हा आनंदोत्सव आहे. त्यानिमित्ताने दिवाळी अंक प्रकाशित करणे हि साहित्य क्षेत्रातील एक रूढ परंपरा आहे. दिवाळी अंकाच्या रूपाने साहित्यिक, सांस्कृतिक आनंद असतो. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे. त्याला ११५ वर्षांची परंपरा आहे. ती जपण्यासाठी लेखक, संपादक आणि वाचक या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रतिनिधी शकील (बाबा) शेख म्हणाले कि, चित्रपटासाठी मागणीनुसार लिखाण करावे लागते. दिवाळी अंकातील लेखन हे स्वानुभ आणि स्वानंद देणारे असल्याने ते अस्सल व दर्जेदार साहित्य असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन संपादक नरेंद्र लचके यांनी केले तर स्वागत सुहास शेलार यांनी केले. तर आभार शकील (बाबा) शेख यांनी मानले.




***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी