शीतल टाईम्स - दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूरात खरेदी महोत्सवाचे आयोजन शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूरात खरेदी महोत्सवाचे आयोजन
शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायत, मर्चन्ट असोशिएशन व किराणा मर्चन्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापार आणि व्यवसाय वृध्दीच्या हेतूने 'बेलापूर खरेदी महोत्सव' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेलापूर येथे १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधित सदरचा खरेदी महोत्सव संपन्न होणार आहे. या खरेदी महोत्सवात सहभागी होण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार आदिंनी आज दि.२ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून कुपन संख्या नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरचा उपक्रम बेलापूरच्या बाजारपेठेला उर्जितावस्था मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित केला आहे. हा उद्देश लक्षात घेवून नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतच दसरा-दिवळी सणांची खरेदी करुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन ग्रामपंचायत, मर्चन्ट व किराणा मर्चन्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
***************************************************
***************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
***************************************************
***************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा