शीतल टाईम्स // घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न "युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम" – महिला हक्क आणि संघटनात्मक एकजुटीवर भर
शीतल टाइम्स प्रतिनिधी शीतल टाईम्स प्रतिनिधी | श्रीरामपूर घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न "युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम" – महिला हक्क आणि संघटनात्मक एकजुटीवर भर श्रीरामपूर – युवाग्राम विकास संस्था व कोरो इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे "घरेलू महिला कामगार संघटना कार्यशाळा" मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन स्नेहालय संस्थेच्या बालभवन प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना हनीफ शेख म्हणाले, "घरकामगार महिला असंघटित क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता व वेतन यासारख्या मूलभूत बाबींसाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो. युवाग्राम संस्था या महिलांच्या सशक्तीकरणासाठी मोलाचे कार्य करत आहे." कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर होते. युवाग्राम संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार यांनी "ज्यांचे प्रश्न... त्यांचे नेतृत्व आणि त्यांचाच आवाज" या संकल्पनेवर भर देत घरकामगार महिलांच्या हक्कासाठी संघटनात्मक बांध...